
रोहित शर्मा हा भारतासोबतच मुंबई इंडियन्सचाही महत्त्वाचा खेळाडू आहे. तो ज्याप्रकारे संघाची सुरूवात करून देतो, ती संघासाठी महत्त्वाची ठरते. पण तो जेव्हा फलंदाजीला येतो, तेव्हा त्याचा दृष्टीकोन काय असतो, विशेषत: मोठ्या स्पर्धांमध्ये, हे आता त्यानेच सांगितले आहे.