

Rohit Sharma on T20 World Cup
Sakal
Rohit Sharma on T20 World Cup: आजतागायत स्पर्धेचे यजमानपद भूषविणाऱ्या देशाने टी-२० विश्वकरंडक जिंकलेला नाही, तसेच सलग दुसऱ्यांदा कोणीही विजेते ठरलेले नाही. पण कर्तृत्व महान असले की इतिहास मागे टाकले जातात आणि हेच सिद्ध करण्यासाठी भारतीय संघ शनिवारपासून (ता. ७) सुरू होणाऱ्या या भव्यदिव्य टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी सज्ज होत आहे.
२००७ नंतर भारताने गतवेळेस रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले होते. फॉर्मात असलेल्या भारतीय संघाची जोरदार तयारी झालेली आहे. आता त्याचे रुपांतर मैदानावरील कामगिरी आणि वर्चस्व सिद्ध करण्याची वेळ आलीय.
२००७ नंतर २०२४ मध्ये पुन्हा भारतीय संघाला विश्वविजेतेपदाचा सन्मान आणि बहुमान मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्माने खास ‘सकाळ’साठी साधलेला संवाद..