यशस्वी जैस्वालने काही महिन्यांपूर्वी गोवा संघात जाण्यासाठी MCA कडे NOC मागितले होते.
या निर्णयामागे मुंबई संघातील संधींचा अभाव व स्पर्धा हे प्रमुख कारण होते.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा यात मध्यस्थी करत यशस्वीला समजावून सांगण्यासाठी पुढे आला.
Why did Yashasvi Jaiswal want to leave Mumbai cricket team? यशस्वी जैस्वालने इंग्लंड दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी करताना पाचव्या कसोटीत भारताच्या विजयात खारीचा वाटा उचलला. या मालिकेत शुभमन गिल व लोकेश राहुल यांच्यानंतर भारताकडून सर्वाधिक धावा यशस्वीने केल्या आहेत.. आता यशस्वी पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेच्या तयारीला लागणार आहे. थकवणाऱ्या इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय खेळाडू सध्या विश्रांतीचा आनंद घेत आहेत. अशात यशस्वीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.