

Rohit Sharma Fan Video: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका (Border Gavaskar Trophy) खेळत आहे.
दरम्यान, दुसरा सामना ऍडलेडमध्ये ६ डिसेंबरपासून सुरू होणार असून हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी तयारी म्हणून भारतीय संघ रविवारी (३० नोव्हेंबर) प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाविरुद्ध कॅनबरा येथे सराव सामना खेळला.