

India vs Australia 2nd Test, Adelaide: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी कॅनबरामधील मनुका ओव्हर स्टेडियमवर प्राईम मिनिस्टर इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळला. या सराव सामन्यानंतर काही प्रश्न उपस्थितीत झाले आहेत. हा सराव सामना अनेकदृष्टीने भारतासाठी महत्त्वाचा होता.
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेडला ६ डिसेंबरपासून दिवस-रात्र कसोटी सामना खेळायचा आहे. त्यामुळे त्या सामन्यासाठी गुलाबी चेंडूने खेळला गेलेला हा सराव सामना महत्त्वाचा होता. याशिवाय रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थला झालेल्या कसोटी सामन्याला मुकले होते.