Rohit Sharma receives special memento for Champions Trophy 2025 triumph at CEAT Cricket Awards.
esakal
Rohit Sharma special award for Champions Trophy 2025 : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याचा मंगळवारी विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मुंबईत पार पडलेल्या सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. रोहित शर्माला २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे नेतृत्व केल्याबद्दल विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले, तर श्रेयस अय्यरला चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू म्हणून स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.