रोहित शर्मा आपल्या लेकी समायरासोबत खेळताना दिसला. रोहितने व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, 'हे वाटतं, त्यापेक्षा कठीण आहे.' समायराच्या हुशारीने रोहित आश्चर्यचकितही झाल्याचे दिसला..भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटीतील निवृत्तीनंतर जरी वनडेतील भविष्याबाबत प्रश्न विचारले जात असले, त्याबद्दल रोज वेगवेगळी चर्चा जरी रंगत असली, तरी रोहित मात्र सध्या मिळालेल्या वेळेत त्याच्या कुटुंबाला वेळ देताना दिसत आहे. त्याने नुकताच त्याच्या लेकीसोबकचा एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे..रोहित शर्मा, विराट कोहली यांचे पुढे काय? BCCI म्हणते, आमचे धोरण स्पष्ट आहे, त्यांचा निर्णय....रोहित शर्माला साडेसहा वर्षांची मुलगी असून तिचं नाव समायरा आहे, जिला तो लाडाने सॅमी असंही म्हणतो. त्याने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ते घरात एक खेळ खेळताना दिसत आहेत. या खेळाचं नाव 'Don't Spill The Water' असं आहे, म्हणजेच पाणी सांडवायचं नाही. या खेळात दोघांनी एका ग्लासमध्ये पाणी ओतायच, ज्याच्यामुळे त्या ग्लासमधून आधी पाणी सांडेल, तो व्यक्ती हरतो. रोहित आणि समायराही हा खेळ अगदी चुरशीने खेळताना दिसत आहेत. समायरा तिच्या बाबाला तो हरणार म्हणून गमतीने डिवचतानाही दिसत आहे. या खेळात समायराने दाखवलेली हुशारी पाहून रोहितही आश्चर्यचकीत झाल्याचे दिसत आहे. अखेर शेवटी रोहितच्या हातून पाणी सांडण्याने तो हरतो, पण समायराच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. खेळ पूर्ण झाल्यावर ते दोघे एकमेकांना गोड मिठीही मारताना दिसत आहेत. रोहित शर्माने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की 'हे वाटतं, त्यापेक्षा कठीण आहे.'.रोहित शर्मा दिसणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यातरोहित नुकताच काही दिवसांपूर्वी बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहचला होता. तिथे त्याने नेट्समध्ये सरावही केला होता. तिथे तो सर्फराज खान आणि आयुष म्हात्रे या मुंबईकर खेळाडूंनाही भेटला. सर्फराजला फलंदाजीच्या टिप्सही देताना तो दिसला होता, तर आयुषला त्याने त्याची बॅट भेटही दिली. तो सराव करत असल्याने तो ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वनडे मालिकेत खेळेल, याचे संकेत मिळाले आहेत..भारतीय संघाला १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ऑस्ट्रेलियात वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित भारतीय संघाचे नेतृत्वही करताना दिसेल. दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या वनडेतील भविष्याबाबत सध्या सातत्याने प्रश्न विचारण्यात येत आहे. अशीही चर्चा आहे की कदाचित जर रोहित आणि विराट २०२७ वनडे वर्ल्ड कपपर्यंत भारताच्या संघात राहिले, तरी रोहितला कर्णधारपद सोडावे लागू शकते. रिपोर्ट्सनुसार कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिका रोहितसाठी अखेरची असू शकते. दरम्यान, याबाबत रोहितने मात्र कोणतेही भाष्य केले नाही..निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?.रोहित शर्माने २०२४ टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ वनडेत सक्रिय आहे..FAQsप्रश्न १: रोहित शर्मा कोणत्या खेळात हरला?उत्तर: तो ‘Don’t Spill The Water’ या खेळात हरला.(Question: In which game did Rohit Sharma lose?)प्रश्न २: रोहितला हरवणारी व्यक्ती कोण होती?उत्तर: त्याची मुलगी समायरा.(Question: Who defeated Rohit Sharma?)प्रश्न ३: या खेळात कसा पराभव झाला?उत्तर: रोहितच्या हातून ग्लासमधले पाणी सांडले.(Question: How did Rohit Sharma lose the game?)प्रश्न ४: रोहित शर्माचा पुढचा दौरा कोणता आहे?उत्तर: तो ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वनडे मालिकेत खेळेल.(Question: What is Rohit Sharma’s next tour?)प्रश्न ५: रोहितने कसोटी क्रिकेटमधून केव्हा निवृत्ती घेतली?उत्तर: मे २०२५ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.(Question: When did Rohit Sharma retire from Test cricket?).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.