Parthiv Patel to replace Ajit Agarkar as chief selector
esakal
Ajit Agarkar replacement BCCI selection committee: भारतीय संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून अजित आगरकरच्या भविष्याबाबत अनिश्चितता अजूनही कायम आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, शुक्रवारी पार पडली आणि यातही आगकरच्या कराराबद्धल काही अपडेट्स समोर आलेले नाहीत. पण, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पुरुष निवड समितीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, हे समजले आहे. रोहित शर्माला ( Rohit Sharma) वन डे संघातून वगळण्याच्या भूमिकेमुळे आगरकरवर BCCI नाराज होती. त्यामुळेच त्याला मुदतवाढ दिली जाणार नसल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत भारताचा व मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू आगरकरची जागा घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.