Broadcasters mistakenly displayed Rohit Sharma and Shubman Gill in Pakistan’s playing XI
esakal
PAK vs BAN broadcaster blunder explained: बांगलादेशने पहिल्या कसोटीत पाकिस्तानला चांगलेच बॅकफूटवर फेकले आहे. मीरपूर कसोटीत यजमान बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ४१३ धावा केल्या. कर्णधार नजमूल होसैन शांतो ( १०१) याचे शतक अन् मोमिनूल हक ( ९१) व मुश्फिकर रहिम ( ७१) यांच्या अर्धशतकांनी संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. पाकिस्तानच्या मोहम्मद अब्बासने ५ विकेट्स घेतल्या.
पण, हा सामना सुरू असताना एक मोठी चूक घडली आणि रोहित शर्माला पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून दाखवले गेले. त्यात शुभमन गिल, तिलक वर्मा हेही प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसले.. नेटकऱ्यांनी मग चांगलीच शाळा घेतली.