Rohit Sharma: 'मी जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार झालो, तेव्हा...', रोहितनं नेतृत्व अन् निवृत्तीवर केलं मोठं भाष्य

Rohit Sharma on Captaincy: रोहित शर्माने भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत आणि त्याच्या निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Sharma
Rohit Sharmakal

Rohit Sharma News: भारताचा कर्णधार रोहित शर्मा सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच अशी चर्चा होती रोहित आगामी टी२० वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणार आहे. पण आता रोहितनेच त्याच्या भविष्याबाबत आणि निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने आणखी काही वर्षे भारतासाठी खेळण्याची मनीषा व्यक्त करताना सध्यातरी आगामी टी20 वर्ल्ड कप आणि 2025 टेस्ट चॅम्पियनशीपवर लक्ष असल्याचे म्हटले आहे.

रोहितने दुबई आय 103.8 सोबत बोलताना सांगितले 'हा प्रवास शानदार झालाय, आता 17 वर्षे होतील. मला अजूनही आशा आहे की मी आणखी काही वर्षे खेळेल आणि क्रिकेटमध्ये काही प्रभाव पाडू शकेल.'

Rohit Sharma
PVR Inox: T20 विश्वचषकासाठी पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा प्लॅन; चित्रपटांनी निराश केल्यावर घेतला 'हा' निर्णय

याशिवाय त्याला मिळालेल्या नेतृत्वाच्या जबाबदारीबद्दलही त्यानं भाष्य केलं. 37 वर्षीय रोहित म्हणाला, 'देशाच्या संघाचे नेतृत्व करणे हा तुम्हाला मिळालेला सर्वात मोठा सन्मान असतो. ममाध्यासाठी मी कधीही विचार केला नव्हता की असा एक दिवस येईल, जेव्हा मी नेतृत्व करेल. पण हो चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांबरोबर घडतात.'

'जेव्हा मी भारताचा कर्णधार झालो, तेव्हा मला फक्त इतकेच हवे होते की सर्वांनी एकाच दिशेने जायला हवे, कारण सांघिक खेळ असाच खेळला जातो. वैयक्तिक यश, आकडेवारी, ध्येय याबाबत हे नसते, तर 11 जणं मिळून काय करू शकतो आणि ट्रॉफी जिंकू शकतो हे महत्त्वाचं असतं.'

Rohit Sharma
Rishabh Pant Vs Sanju Samson : टी 20 वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन कोण आहे टीम इंडियाची पहिली पसंती?

रोहितने त्याच्या कारकि‍र्दीत आलेल्या यश-अपयशाबद्दलही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'मी माध्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मी जे भूतकाळात पाहिले आणि अपयशात अनुभवले, त्यामुळेच आज मी जसा व्यक्ती आहे, तसा घडलो.'

दरम्यान, रोहित सध्या आयपीएल 2024 मध्ये व्यस्त आहे. तो मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. मुंबईचा या स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना बाकी आहे. त्यानंतर रोहित टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघासह अमेरिकेला रवाना होईल. टी20 वर्ल्ड कप 1 ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये खेळवला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com