Rohit Sharma ODI future BCCI meeting
esakal
Gautam Gambhir Ajit Agarkar BCCI meeting Rohit Sharma: रोहित शर्मा २०२७ चा वन डे वर्ल्ड कप खेळणार की नाही? याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. भारताचा माजी कर्णधार रोहितला पुढच्या वर्षीचा वर्ल्ड कप खेळायचा आहे, परंतु त्याचे वय पाहता निवड समिती व संघ व्यवस्थापन वेगळा विचार करत आहे. इंग्लंड दौऱ्यावर रोहितला त्याच्या भवितव्याबाबत स्पष्ट सांगण्यात आल्याचे वृत्त होते आणि रोहितने तेव्हाच निवृत्ती घेण्याचे मन बनवल्याचे सांगण्यात येत आहे. पण, रोहितच्या देहबोलीतून तसे काही दिसले नाही आणि तो अजूनही वर्ल्ड कप खेळण्याच्या तयारीतच आहे. अशा परिस्थितीत सध्या मुंबईत सुरू असलेल्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.