

Rohit Sharma on Arshdeep Singh
Sakal
Rohit Sharma on Arshdeep Singh 2026 T20 World Cup Role: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. या मालिकेतून भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी तयारी करत आहे.
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघ (Team India) गतविजेता म्हणून खेळणार असून त्यांच्यासमोर ट्रॉफी राखण्याचे आव्हान आहे. तरी भारतीय संघाकडे प्रबळ दावेदार समजले जात आहे.
याच दरम्यान आता भारताचा टी२० वर्ल्ड कप विजेता कर्णधार आणि टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा ब्रँड अँबेसिडर असलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) कोणता खेळाडू भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.