Rohit Sharma’s heart-touching reply to a kid’s question on 2027 World Cup goes viral.
esakal
Rohit Sharma confirms he wants to play 2027 World Cup: तुम्ही २०२७ चा वर्ल्ड कप खेळणार का? निरागस मुलाच्या प्रश्नावर रोहित शर्माने मराठीतून दिलेलं उत्तर मनाला स्पर्श करणारे ठरले. ३७ वर्षीय रोहितच्या वन डे वर्ल्ड कप खेळण्यावरून बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्याच्याकडून वन डे संघाचे नेतृत्व काढून घेतले गेले आणि त्यामुळे या चर्चा अधिक तीव्र झाल्या. रोहितच्या नेतृत्वाखाली मागील दोन वर्षांत भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा दुष्काळ संपवला. आता रोहितला फक्त वन डे वर्ल्ड कप उंचवायचा आहे आणि त्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची सर्वांना चिंता आहे.