Rohit Sharma narrated a heated on-field incident with Steve Smith in a humorous way
esakal
Steve Smith Rohit Sharma on-field spat explained: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या फक्त वन डे क्रिकेट खेळतोय आणि त्याने २०२७ चा वर्ल्ड कप खेळण्याचा निर्धार पक्का केला आहे. त्यासाठी तो जिममध्ये कसून मेहनतही करतोय. वयावरून रोहितला वन डे तून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला गेला, पण हिटमॅनने आपले वजन कमी करण्यासह मैदानावरही धडाकेबाज खेळी करून सर्वांची बोलती बंद केली. सध्या त्याचा जिममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्याच्या मिश्किल स्वभावाची प्रचिती येथेही आली आहे.