

Rohit Sharma Speaks Out On Critics & Virat Kohli
Sakal
England vs India 3rd ODI: भारतीय संघाला रविवारी (१९ जुलै) लॉर्ड्सवर झालेल्या वनडे सामन्यात इंग्लंडविरुद्ध २७ धावांनी पराभवाचा धक्का बसला. वनडे मालिकेतील हा तिसरा आणि निर्णायक सामना होता. त्यामुळे इंग्लंडने विजयासह मालिकाही २-१ अशा फरकाने जिंकली. पण असे असले तरी या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) खणखणीत शतक करत टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.
खरंतर या सामन्यापूर्वी रोहितच्या खराब फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. असेही रिपोर्ट्स समोर आले होते की भारतीय संघ व्यवस्थापन रोहितचा २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठी विचार करत नाही. त्यामुळे तो या सामन्यानंतर निवृत्ती घेईल.
मात्र रोहितने लॉर्ड्सवर शतक (Lord's Century) करत सर्वच चर्चांना सध्या तरी पूर्णविराम लावला आहे. या सामन्यानंतर रोहितने बऱ्याच गोष्टींवर त्याची स्पष्ट प्रतिक्रियाही दिली आहे. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.