Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

Rohit Sharma slips while getting off team bus video: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचा जल्लोष सुरू होता. मात्र हॉटेलकडे परतताना टीम बसजवळ एक क्षण सर्वांची धावपळ उडवणारा ठरला.
Rohit Sharma slips while getting off team bus video

Rohit Sharma slips while getting off team bus video

esakal

Updated on: 

Rohit Sharma slipped after India vs West Indies 1st ODI: भारतीय संघाने पहिल्या वन डेत वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विराट कोहली व शुभमन गिल यांच्या शतकांनी हा सामना गाजवला, रोहित शर्मानेही चांगली फटकेबाजी केली. या विजयानंतर टीम इंडिया जेव्हा हॉटेलला पोहोचली, तेव्हा एक अनपेक्षित घटना घडली. भारताचे खेळाडू हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करत होते, तेच बसमधून उतरताना रोहितचा पाय घसरला अन् तो धाडकन पडला... viral Video हा कालच्या सामन्यानंतरचा असल्याचा दावा केला जातोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com