

Rohit Sharma Special Message To Mumbai Indians Fans
esakal
Rohit Sharma Message to Mumbai Paltan: आयपीएल २०२७ सुरू होण्यापूर्वीच अनेक मोठ्या गोष्टी समोर आल्या आहेत. आयपीएल इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्स हा संघ बलाढ्य संघांपैकी एक मानला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांत या संघात अनेक उलथापालथी सुरू होत्या.
२०२३ मध्ये जेव्हा मुंबई संघाच्या व्यवस्थापनाने संघातील सर्वात यशस्वी राहिलेल्या कर्णधाराला पदावरून काढून टाकलं, तेव्हापासून संघावर आणि संघ व्यवस्थापनावर टीका होत होती.