
Australia vs India 4th Test: सोमवारी (३० डिसेंबर) भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात १८४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पराभव देखील टाळला.
मात्र, या सामन्यात यशस्वी जैस्वालची दुसऱ्या डावातील विकेट वादग्रस्त ठरली. त्यावर बोलताना सुनील गावसकरांनी तिखट शब्दात टीका केली आहे, तर भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही प्रतिक्रिया दिली आहे.