Pragyan Ojha and RP Singh are tipped to join the Ajit Agarkar-led senior selection committee
esakal
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीत दोन नवे सदस्य येणार आहेत.
या दोघांनीही रोहित शर्मासोबत भारतासाठी व मुंबई इंडियन्ससाठी खेळले आहे.
बीसीसीआयने निवड समितीतील रिक्त पदांसाठी अर्ज मागवले होते, पण प्रतिसाद थंड होता.
Ajit Agarkar-led selection committee to get two new members : रोहित शर्माच्या २०२७ साली होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यावरून बरीच चर्चा सुरू आहे. ३७ वर्षीय रोहित तोपर्यंत तंदुरुस्त राहिल का? हा खरा प्रश्न आहे आणि त्यावरूनच निवड समिती प्रमुख अजित आगरकर व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हिटमॅनला खेळवण्यासाठी उत्सुक नसल्याची चर्चा आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वन डे मालिका ही रोहित व विराट कोहलीसाठी शेवटची ठरू शकते, असेही तर्क लावले जात आहेत. पण, आता अजित आगरकरच्या निवड समितीत रोहितचे दोन पंटर जाण्याच्या तयारीत आहेत.