Rohit Sharma and Virat Kohli suddenly disappeared from the ICC ODI rankings
esakal
Ajit Agarkar insists Rohit and Kohli play Vijay Hazare Trophy : विराट कोहली व रोहित शर्मा यांना भारताच्या वन डे संघात कायम राहायचे असल्यास निवड समिती प्रमुख अजित आगरकर याचे ऐकावेच लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या वन डे संघात रोहित व विराट या दोघांचाही समावेश केला गेला आहे, परंतु कर्णधारपदाची माळ शुभमन गिलकडे सोपवून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने भविष्याचे संकेत दिले आहेत. अशात विराट व रोहित यांना संघातील स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, हे निश्चित आहे. वाढते वय हे त्यांच्या २०२७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याच्या मार्गात आडवे येत आहे.