Why is Rohit Sharma and Virat Kohli’s return to Team India delayed
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळतोय. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला मालिकेची सुरुवात पराभवाने करावी लागली. या मालिकेनंतर भारतीय संघ मर्यादित षटकांचं क्रिकेट खेळणार आहे. बांगलादेश दौऱ्यापासून भारताच्या मर्यादित षटकांच्या मालिकेला सुरुवात होईल आणि त्या दौऱ्यावर तीन वन डे व पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. विराट कोहली व रोहित शर्मा या दौऱ्यातील वन डे मालिकेतून पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहेत. या दोघांनी मागील महिन्यात कसोटीतून आणि मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० मालिकेतून निवृत्ती जाहीर केली होती.