
India vs England ODI and T20I Series: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील अखेरचा सामना अद्याप बाकी आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानात नव्या वर्षाच्या सुरुवातीला खेळायचा आहे.
हा सामना ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या सामन्यानंतर १५ दिवसांनी भारतीय संघाला इंग्लंड संघाचा सामना करण्यासाठी सज्ज व्हावे लागणार आहे. इंग्लंड संघ जानेवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड भारताविरुद्ध ५ सामन्यांची टी२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. २२ जानेवारीपासून टी२० मालिका सुरू होईल.