RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

New Zealand vs India ODI Series Schedule & Live Streaming Details: न्यूझीलंड दौऱ्यात टी२० मालिकेनंतर भारतीय संघाला ५ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली जोरदार तयारी करत असून त्यांचा व्हिडिओही बीसीसीआयने शेअर केला आहे.
Rohit Sharma - Virat Kohli | India vs New Zealand ODI

Rohit Sharma - Virat Kohli | India vs New Zealand ODI

Sakal

Updated on: 

India vs New Zealand ODI Series: भारतीय टी२० संघ सध्या न्यूझीलंडमध्ये मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिले चार सामने झाले असून भारताने ३-१ अशी विजयी आघाडीही घेतली आहे. या मालिकेतील आता पाचवा आणि अखेरचा सामना १ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. यानंतर न्यूझीलंडमध्ये भारताची वनडे मालिका खेळली जाणार आहे.

अनेक दिवसांनंतर भारतीय संघ ५ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) हे देखील खेळताना दिसणार आहेत. ते पाचही वनडे सामन्यासाठी उपलब्ध असणार आहेत.

Rohit Sharma - Virat Kohli | India vs New Zealand ODI
IND vs NZ, 4th T20I: वैभव सूर्यवंशीला बाकावर बसवणं महागात पडलं? आधी फिलिप्सने चोपलं अन् मग गोलंदाजांनी सतावलं; भारताचा न्यूझीलंडकडून दारुण पराभव
Loading content, please wait...