

India vs New Zealand T20I
Sakal
New Zealand vs India 4th T20I: न्यूझीलंडने अखेर भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथा सामना जिंकून व्हाईटवॉशचा धोका टाळला आहे. ऑकलंडला झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ८७ धावांनी विकेट्स विजय मिळवला. त्यामुळे आता मालिका ३-१ अशा स्थितीत आहे.
भारताने पहिले तिन्ही सामने जिंकले असल्याने आधीच ही मालिका खिशात टाकलेली नाही. दरम्यान, न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) आणि मायकल ब्रेसवेल (Michael Bracewell) यांच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनीही विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यातही जेकॉब डफीने (Jacob Duffy) भारताला मोठे धक्के दिले.
या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडने सर्वात मोठे २६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला २० षटकात ९ बाद १७२ धावाच करता आल्या. या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला खेळवण्यात आले नव्हते, त्यामुळे बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. आता पराभवानंतरही याबाबत चर्चा होत आहे.