
रविवारचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीय ठरला. भारतीय संघाने १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. रविवारी दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ४ विकेट्सने पराभूत करत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताचे हे एकूण तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद ठरले.