World Cup 2027: न्यूझीलंडमध्ये रोहित-विराटच्या बॅट शांत; तरीही वर्ल्डकप २०२७ मध्ये खेळणार? निवडीबाबत मोठी अपडेट समोर

Rohit Sharma Virat Kohli 2027 ODI World Cup: २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार का, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर या दोघांचा अनुभव महत्त्वाचा ठरेल, असा दावा बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने केल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
Rohit Sharma Virat Kohli 2027 ODI World Cup

Rohit Sharma Virat Kohli 2027 ODI World Cup

esakal

Updated on: 

Rohit Sharma Virat Kohli 2027 ODI World Cup: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. याआधी झालेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला होता. मात्र, एकदिवसीय मालिकेत भारताचे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

त्यामुळे २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये या दोघांना भारतीय संघात स्थान मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रोहित आणि विराट यांच्या अनुभवावर बीसीसीआयचा विश्वास असून, दोघेही २०२७ चा वर्ल्ड कप खेळू शकतात, असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

Loading content, please wait...