Rohit Sharma and Virat Kohli
esakal
India’s complete ODI schedule till March 2027 : रोहित शर्मा व विराट कोहली यांनी सात महिन्यानंतर टीम इंडियात पुनरागमन केले.. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील तिसऱ्या वन डे सामन्यात RO-KO जोडीने मैदान गाजवले आणि मालिकेचा शेवट विजयाने केला. हा या दोघांच्या वन डे कारकीर्दितील शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा ठरला आहे आणि रोहितने भावनिक पोस्ट लिहून ऑस्ट्रेलियाचा निरोप घेतला. पण, रोहित व विराट आता पुन्हा केव्हा निळ्या जर्सीत दिसतील? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.