
भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा वनडे सामना बुधवारी (१२ फेब्रुवारी) रोजी सुरू झाला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात असून चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी होणारा हा शेवटचा सामना आहे.
त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात विजयी लय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होण्याचा प्रयत्न करणार आहेत. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.