Ross Taylor comes out of retirement to play for Samoa
esakal
न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर तीन वर्षांनी निवृत्ती मागे घेत पुन्हा मैदानावर उतरणार आहे.
टेलर न्यूझीलंड नव्हे तर आपल्या आईच्या मातृभूमी सामोआ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तो आशिया-पूर्व आशिया-पॅसिफिक ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ पात्रता स्पर्धेत सामोआकडून खेळेल.
Ross Taylor comes out of retirement to play for Samoa : न्यूझीलंडचा ४१ वर्षीय फलंदाज रॉस टेलर याने तीन वर्षांनंतर निवृत्ती मागे घेतली आहे, परंतु तो दुसऱ्याच संघाकडून खेळणार आहे. त्याच्या आईचं माहेर असलेल्या सामोआ संघाचे तो प्रतिनिधित्व करणार आहे. आगामी आशिया-पूर्व आशिया-पॅसिफिक ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ पात्रता स्पर्धेत तो सामोआचे प्रतिनिधित्व करणार आहे. ओमान येथे होणाऱ्या या स्पर्धेत खेळून टेलर सामोआ संघाला पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची पात्रता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या १५ सदस्यीय संघात टेलरच्या नावाचा समावेश आहे.