Jofra Archer reacts after an expensive 11-ball opening over against Gujarat Titans
esakal
Rajasthan Royals vs Gujarat Titans Marathi Updates: रियान परागला दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सच्या आजच्या सामन्याला मुकावे लागले. यशस्वी जैस्वाल त्याच्या जागी कर्णधारपद भूषवतोय आणि गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने लक्ष्याचा पाठलाग करण्याचे ठरवले. पण, जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) पहिल्याच षटकात GT ला संधी दिली. पहिले षटक पूर्ण करण्यासाठी जोफ्राला ११ चेंडू फेकावे लागले आणि RR ने १८ धावा दिल्या. पण, या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वादाला वाचा फोडणारी चिटिंग गुजरातने केली.