Vaibhav Sooryavanshi
esakal
Rajasthan Royals vs Gujarat Titans Marathi Updates: वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील शनिवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर २३० धावांचे लक्ष्य उभारले गेले. पण, वैभव त्याच्या स्टाईलमध्येच खेळला आणि त्याने आयपीएल इतिहासातील विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर अन् ख्रिस गेल, या दिग्गज फलंदाजांना मागे टाकणारा विक्रम नोंदवला.