

Brijesh Sharma celebrates after picking crucial wickets as RCB crumble in RR vs RCB clash.
esakal
Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Marathi Updates: राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी इंडियन प्रीमिअर लीग २०२६च्या १६ व्या सामन्यात वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय. जोफ्रा आर्चरने डावातील पहिल्याच चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला धक्का दिला. त्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) चांगली फटकेबाजी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रवी बिश्नोईच्या गुगलीने विराटची दांडी गुल केली आणि त्यानंतर पडझड सुरू झाली. आयपीएल २०२६ मधील दुसराच सामना खेळणाऱ्या ब्रिजेश शर्माने ( Brijesh Sharma) प्रभावी मारा करताना दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि RCB ची अवस्था दयनीय केली.