ऋतुराज गायकवाडने काउंटी चॅम्पियनशिप २०२५ मधून माघार घेतली
यॉर्कशायर क्लबकडून खेळून तो काउंटी चॅम्पियनशिपमध्ये पदार्पण करणार होता
ऋतुराजच्या अचानक माघार घेतल्याने यॉर्कशायरच्या रणनीतींना धक्का बसला आहे.
Why Ruturaj Gaikwad withdrew from Yorkshire stint : यॉर्कशायर क्लबच्या डावपेचांना शनिवारी धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने त्याच्या पहिल्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. २८ वर्षीय ऋतुराज पदार्पणासाठी सज्ज होता आणि तो क्लबसाठी पाच सामने खेळणार होता. पण, २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या डिव्हिजन वन सामन्याच्या आधीच त्याने माघार घेतली. गतविजेत्या सरेविरुद्ध हा सामना होणार होता, परंतु त्याने सामन्याच्या काही दिवसाआधी खेळणार नसल्याचे क्लबला कळवले.