WPL 2024 MIW vs UPW : स्लॉग ओव्हरमध्ये सजनाचा स्वॅग; मुंबईची यूपीविरूद्ध फायटिंग टोटल

MIw vs UPw
MIw vs UPw esakal

Women's Premier League 2024 MIw vs UPw : महिला प्रीमियर लीगच्या आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्स यूपी वॉरियर्स विरूद्ध 6 बॅटरच्या मोबदल्यात 160 धावा उभारल्या. सुरूवात खराब करणाऱ्या मुंबईच्या मधल्या फळीने डाव सावरला. तर स्लॉग ओव्हरमध्ये धडाकेबाज फलंदाज सजनाने दमदार फलंदाजी करत मुंबईला 150 धावांचा टप्पा पार करून दिला.

MIw vs UPw
Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालनं विराटलाही टाकलं मागं; इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत केला 'हा' मोठा विक्रम

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरूवात खराब झाली होती. मुंबईच्या दोन्ही सलामीवीर अवघ्या 17 धावांवर माघारी परतल्या होत्या. यस्तिका भाटियाने 9 त हायले मॅथ्यूजने 4 धावांचे योगदान दिलं.

यानंतर आलेल्या नॅट सिव्हर ब्रंट आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने तिसऱ्या विकेटसाठी 59 धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र 31 चेंडूत 45 धावा करणाऱ्या नॅटचा राजेश्वरी गायकवाडने त्रिफळा उडवला अन् ही जोडी फोडली. त्यानंतर हरमनप्रीत 33 चेंडूत 30 धावा करून बाद झाली. पाठोपाठ अमरजीत कौर देखील 7 धावांची भर घालून दिप्ती शर्माची शिकार झाली.

MIw vs UPw
IND vs ENG 5th Test Kuldeep Yadav : कुलदीपनं कमाल केली! 92 वर्षाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय

मुंबईची अवस्था 16 षटकात 5 बाद 117 धावा अशी झाली असताना एमेलिया केर आणि एस सजनाने स्लॉग ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी करत मुंबईला 20 षटकात 6 बाद 160 धावांपर्यंत पोहचवले. केरने 23 चेंडूत 39 धावा केल्या तर एस सजनाने शेवटच्या दोन षटकात चौकारांची आतशबाजी करत 4 चौकारांसह 14 चेंडूत 22 धावा केल्या.

मुंबईचे 160 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यूपीची पॉवर प्लेमध्येच अवस्था बिकट झाली. त्यांनी 6 षटकात फक्त 17 धावा कर 3 फलंदाज गमावले.

(Cricket News In Marathi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com