
भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत यांच्यावर २०१३ साली स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी आली होती. त्याची ही बंद २०२० साली संपली. त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट काही काळ खेळला. त्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. तो समालोचन करतानाही आता दिसतो.
दरम्यान, आता त्याला पुन्हा एकदा बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. यावेळी त्याच्यावर केरळ क्रिकेट असोसिएशनने बंदीची कारवाई केली आहे.