Steve Smith most catches by a fielder in Test cricket
esakal
Steve Smith record-breaking catch against South Africa : दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका रोमांचक वळणावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३९० धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेला २८४ धावा करता आल्या आणि ऑसींनी दुसऱ्या डावात बिनबाद ३३ धावा करून १३९ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा डाव गुंडाळून पाहुण्यांनी सामन्यावर पकड घेतली आहे आणि या डावात स्टीव्ह स्मथिची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याने चार अफलातून झेल घेऊन आफ्रिकेच्या फलंदाजांना आश्चर्यचकीत केले. याच कामगिरीसह त्याने वर्ल्ड रेकॉर्डही नोंदवला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याचा त्याने विक्रम मोडला.