Marco Jansen
esakal
South Africa tighten grip on Australia in second Test 2026 : दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटीतील पराभवाची सव्याज परतफेड करण्याचा निर्धार केला आहे. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी मजबूत पकड घेतली आहे. या कसोटीचा निकाल जरी ड्रॉ च्या दिशेने जात असला तरी दोन दिवसांत चमत्कार घडवण्याची धमक आफ्रिकेने दाखवली आहे. कागिसो रबाडाने ताशी १५४.५ kph वेगाने चेंडू टाकून ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला गांगरून टाकले, त्यानंतर मार्को यान्सेसने करेक्ट कार्यक्रम केला.