

Sachin Tendulkar Batography
esakal
मुंबई : क्रिकेट खेळत असताना वापरलेली सर्व आयुधे माझ्यासाठी शरीराचा भाग आहेत, बॅट तर काळजाचा तुकडा आहे, अशी भावना महान आणि सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केली.
निमित्त होते त्याने मुंबई क्रिकेट संघटनेच्या म्युझियमसाठी भेट दिलेल्या स्वतःच्या २५ बॅटच्या कार्यक्रमाचे. ‘बॅटोग्राफी‘ असा नव्याने तयार करण्यात आलेला शब्द सचिनच्या या मौल्यवान बॅटच्या दालनाला देण्यात आला.