अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकचा साखरपुडा १३ ऑगस्ट रोजी खाजगी समारंभात झाला.
या सोहळ्यास फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते.
सानिया चंडोक ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून तिचा कौटुंबिक व्यवसाय खाद्य-आतिथ्य क्षेत्रात आहे.
Sachin Tendulkar’s statement on Arjun Tendulkar’s engagement : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याचा खरंच साखरपुडा झाला आहे का? मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकशी त्याचा साखरपुडा झाला आहे का? अशी बरीच प्रश्न सध्या सचिन तेडुलकरच्या चाहत्यांच्या मनात आहेत. सचिन एवढा मोठा सेलेब्रिटी अन् मुलाचं लग्न मोजक्याच लोकांमध्ये केलं, याचं अनेकांना आश्चर्यही वाटतंय. त्यामुळे अर्जुन-सानियाच्या साखरपुड्याचं वृत्त अजूनही खरं वाटत नाहीए.. पण, क्रिकेटचा देव सचिन याने यावर मोठं भाष्य केले आहे.