
इंग्लंड विरुद्ध हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजी चमकली. भारताने पहिल्याच डावात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि रिषभ पंत यांनी शतके केली. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही यात समावेश आहे. त्याने शुभमन गिल आणि रिषभ पंतने मैदानात दाखवलेल्या हुशारीचेही कौतुक केले आहे.