
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आत्तापर्यंत अनेक मान-सन्मान मिळवले आहेत. आता आणखी एक मोठा सन्मान त्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये बीसीसीआयचे मुख्यालय आहे. या मुख्यालयात आता एका बोर्ड रुमला सचिनचे नाव देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही सचिनच्या हातून झाले. या बोर्ड रुमला सचिनच्या नावातील अद्याक्षरे आणि त्याच्या शतकांची संख्या म्हणजेच 'SRT100 असे नाव देण्यात आले आहे.