
रनमशीन, किंग अशा वेगवेगळ्या टोपननावाने ओळखला जाणाऱ्या विराट कोहलीने सोमवारी (१२ मे) सर्वांना मोठा धक्का दिला. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. १४ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमधील प्रवास थांबवत असल्याचे त्याने सांगितले. त्याने घोषणा करताच अनेक आजी-माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनेकांनी विराटचे यशस्वी कसोटी कारकिर्दीसाठी अभिनंदन केले आहे. त्यातही सचिन तेंडुलकरच्या पोस्टने अनेकांचे लक्ष्य वेधले आहे. सचिनने विराटसाठी मोठी सोशल मिडिया पोस्ट लिहिली आहे.