इंग्लंडचा जो रुट सचिन तेंडुलकरच्या कसोटी धावांच्या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी रुटला २३७८ धावांची गरज आहे. सचिनने रुटला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा काय वाटलं होतं, याबाबत खुलासा केला आहे. .इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू जो रुट गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करत आहे. त्याने गेल्या ५-६ वर्षात कसोटीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. आता तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्याही जवळ आहे..IND vs ENG 5th Test: मोहम्मद सिराज मॅजिक! Joe Root ची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी अन् मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम.सध्या जो रुट सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १३५४३ धावा कसोटीमध्ये केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने २०० कसोटीत १५९२१ धावा केल्या आहेत. सचिनला मागे टाकण्यासाठी रुटला आता केवळ २३७८ धावा करण्याची गरज आहे. दरम्यान, रुट मोठा खेळाडू असल्याचे त्याच्या पदार्पणावेळीच लक्षात आल्याचे सचिन तेंडुलकरने म्हटले आहे..रेडिटवरील आस्क मी एनीथिंग सत्रादरम्यान सचिनला एका युझरने सचिनला याबाबात प्रश्न विचारला. त्याने विचारले की 'जो रुटबाबत तुझी सर्वात पहिली भावना काय होती, त्याने आता १३ हजार कसोटी धावांचाही टप्पा ओलांडला असून तो तुझ्या मागे दुसऱ्याच क्रमांकावर आहे. त्याने पहिला सामना तुझ्याविरुद्ध खेळला होता.'.सचिनने उत्तर दिले की '१३००० धावांचा टप्पा पार करणे खरंच मोठं यश आहे आणि तो अजूनही खेळत आहे. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा त्याच्या पदार्पणावेळी २०१२ मध्ये नागपूरला खेळताना पाहिले होते, तेव्हा मी माझ्या संघसहकाऱ्यांना सांगितले होते की ते भविष्यातील इंग्लंडच्या कर्णधाराला पाहात आहेत. त्याने ज्याप्रकारे खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि स्ट्राईक रोटेट केली, ते पाहून मी सर्वाधिक प्रभावित झालो होतो. मला त्या क्षणीच जाणवलं की हा एक मोठा खेळाडू होणार.'.IND vs ENG 5th Test: शांत स्वभावाच्या Joe Root चा पारा चढला, प्रसिद्ध कृष्णा असं नेमकं त्याला काय म्हणाला? अम्पायरची मध्यस्थी.जो रुटने २०१२ मध्ये नागपूरला भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणाच्या या सामन्यात त्याने पहिल्याच डावात २२९ चेंडूत ७३ धावांची खेळी केली होती. तसेच दुसऱ्या डावात तो २० धावांवर नाबाद राहिला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता..FAQ१. जो रूट सध्या कसोटीतील किती धावा केल्या आहेत?➤ जो रूट कसोटीत आत्तापर्यंत 13,543 धावा करून दुसऱ्या क्रमांकावर आहे.(How many Test runs does Joe Root have currently?)२. सचिन तेंडुलकरच्या कसोटी किती धावांचा विक्रम आहे?➤ सचिनने 200 कसोटीत 15,921 धावा केल्या आहेत.(What is Sachin Tendulkar’s Test record?)३. जो रूटला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी किती धावा हव्यात?➤ जो रूटला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी अजून 2,378 धावा करायच्या आहेत.(How many runs does Root need to break Sachin’s record?)४. जो रूटने कसोटी पदार्पण कुठे केले?➤ जो रूटने 2012 मध्ये नागपूर, भारतात पदार्पण केले.(Where did Joe Root make his Test debut?)५. जो रूटच्या पदार्पणातील कामगिरी कशी होती?➤ पहिल्या डावात 73 धावा, दुसऱ्या डावात 20 नाबाद धावा.(How did Root perform in his debut Test?)६. सचिन तेंडुलकरला रूटबद्दल पहिलं इंप्रेशन काय होतं?➤ सचिनला लगेच जाणवलं की हा भविष्यातील इंग्लंडचा कर्णधार आहे.(What was Sachin’s first impression of Joe Root?)७. सचिन रूटच्या कोणत्या खेळीवर प्रभावित झाला?➤ रूटने पिचचा अंदाज घेणे आणि स्ट्राईक रोटेट करणे, यावर तो प्रभावित झाला.(What impressed Sachin most about Root’s batting?).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.