
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर भारत - इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. लॉर्ड्स हे प्रसिद्ध स्टेडियम असून त्याला मोठा इतिहासही आहे. त्यामुळे या स्टेडियमवर खेळण्याचे अनेकांचे स्वप्न असतं.
दरम्यान या स्टेडियममध्ये MCC संग्रहालय देखील आहे. यामध्ये क्रिकेटच्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. गुरुवारपासून सुरू झालेल्या भारत - इंग्लंड यांच्यातील तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा मास्टर - ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा सन्मान करण्यात आला.