
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी शनिवारी भारतीय संघाची निवड होणार आहे. या स्पर्धेसाठी आता कोणाकोणाला संधी मिळणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यातही भारतीय संघाच्या वरच्या फळीत कर्णधार रोहित शर्मासोबत कोणाला संधी मिळणार याची चर्चा आहे.
यासाठी शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल यांची नावं आघाडीवर असली, तरी त्यांच्याशी शर्यत करणारं एक नावंही सध्या जोरदार चर्चेत आहे, ते नाव म्हणजे करूण नायर. ३३ वर्षीय करुण नायरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.