
भारत आणि इंग्लंड संघात येत्या २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ कसून सरावही करत आहेत. पण या मालिकेपूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ECB) मिळून एक मोठा निर्णय घेतला होता.
त्यांनी भारत आणि इंग्लंड संघात कसोटी मालिकेसाठी पतौडी ट्रॉफी हे नाव हटवून या मालिकेला तेंडुंलकर-अँडरसन ट्रॉफी हे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी त्यावर टीकाही केली होती.