
Sachin Tendulkar & Sourav Ganguly Save Indian cricket:
६ जुलै १९९८ मध्ये भारतातून कोलंबो येथे एक फोन गेला... समोर कोण होतं माहित नाही, परंतु ज्या व्यक्तीने तो फोन केला होता आणि त्याने जे सांगितलं, ते ऐकून भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अंशूमन गायकवाड हे चिंतीत झाले होते. आता काय करावे, हेच त्यांना सुचेनासे झाले होते. पण, त्यांनी स्वतःला सावरले आणि त्वरित ते सचिन तेंडुलकरच्या रूममध्ये धावले... सचिनने तातडीने कर्णधार सौरव गांगुलीला बोलावून घेतले.. भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप घडवणारी तो गोष्ट होती...समोरच्या व्यक्तिने जे काही सांगितलेलं ते धक्कादायक होतं आणि जर तसं घडलं असतं तर भारतीय क्रिकेटचं अस्तित्व तेव्हाच हरवलं असतं.. पण, सचिन व सौरभ यांनी एक निर्णय घेतला आणि त्यांच्यामुळेच भारतीय क्रिकेट वाचलं... असं नेमकं काय घडलं होतं? फोनवरील त्या व्यक्तिने असं काय सांगितलं होतं?