
रविवारी (११ मे) जगभरात मातृदिन साजरा होत आहे. यानिमित्ताने आपल्या आईचा दिवस अनेकांनी विविध स्वरुपात खास बनवला आहे. काहींनी सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर करत प्रेम व्यक्त केलं आहे.
भारतीय खेळाडूंनीही सोशल मीडियातून आईबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक खेळाडूंचा समावेश आहे. सर्वांप्रमाणेच खेळाडूंच्याही आयुष्यात आईचा पाठिंबा महत्त्वाचा असतो.