Sahibzada Farhan celebrates his century against Namibia during the T20 World Cup clash.
esakal
Pakistan vs Namibia T20 World Cup Marathi News: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पाकिस्तानी संघाने लिंबूटिंबू नामिबियाला झोडले. भारताविरुद्ध शून्यावर माघारी परतलेल्या साहिबजादा फरहान ( Sahibzada Farhan ) याने शतक झळकावले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकावणारा तो दुसरा पाकिस्तानी फलंदाज ठरला.