
भारतीय क्रिकेट संघ २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी जूनच्या सुरुवातीलाच भारताचा संघ इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. पण अद्याप या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झालेली नाही.
भारतीय संघ निवडण्यासाठी अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील निवड समिती २४ मे रोजी मुंबईत बैठक घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटीतून निवृत्ती घेतली असल्याने त्यांची या मालिकेसाठी निवड होणार नाही, हे निश्चित आहे. पण दोन अनुभवी खेळाडू संघात नसताना त्यांची जागा भरून काढण्यासाठी भक्कम संघ निवडण्याचे आव्हान निवड समितीसमोर असेल.